नशिराबाद (प्रतिनिधी):
नशिराबाद शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल नशिराबादचा 82 वा वर्धापन दिन २ जुलै रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा सेवानिवृत्त सहाय्यक महाप्रबंधक (BSNL, जळगाव) श्री. जे. एस. किनगे उपस्थित होते. आपल्या मनोगतातून त्यांनी शालेय आठवणींना उजाळा दिला. तसेच, विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कानमंत्र देत यशासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशिराबाद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी होते. कार्याध्यक्ष तथा नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले, त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आणि संस्थेच्या प्रदीर्घ कार्याला उजाळा दिला. नगरसेवक वासिफ अली यांनीही संस्थेच्या कार्याचे गुणगौरव केले.
याप्रसंगी शाळेच्या ग्रंथालयासाठी कपाट भेट देणारे डॉ. कांतीलाल नारखेडे यांचा संस्थेच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. ए. बनसोडे यांनी मांडले आणि वर्षभरातील शालेय उपक्रमांचा आढावा घेतला.
गुणगौरव सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये दहावीची विद्यार्थिनी पूजा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वनिता तळेले (द्वितीय), भूमिका गायकवाड व देवयानी महाजन (तृतीय) यांच्यासह लिखित पाटील, उत्कर्षा पाटील, शर्वरी करुले, धनंजय उघडे, दिव्या जावडे, गणेश कोडी, ललित नारखेडे, सोनाक्षी सुरवाडे, कृष्णा मोरे आणि खुशी चौधरी या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. दात्यांच्या ठेवीच्या व्याजातून व रोख स्वरूपात जवळपास २२ हजार रुपयांची बक्षिसे विद्यार्थ्यांना देण्यात आली.
शाळेचे ज्येष्ठ संचालक जनार्दन माळी यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. वर्धापन दिनानिमित्त शाळेतील सर्व दोन हजार विद्यार्थ्यांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे बक्षीस वाचन राजू पाचपांडे, जी. टी. पाटील आणि एन. सी. भिरूड यांनी केले. याप्रसंगी प्रमिला महाजन, सुनीता पाटील, मधुकर चौबे, विनायक वाणी, ॲड. प्रदीप देशपांडे, डॉ. संदीप महाजन, भोजराज पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ उपस्थित होते. तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रवीण महाजन, सौ. बनसोडे मॅडम, उपमुख्याध्यापक ए. डी. चौधरी, पर्यवेक्षक एस. एन. पाचपांडे आणि सर्व विभागांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. ओ. चौधरी व सौ. जी. एस. महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन जी. टी. पाटील यांनी मानले.
- Home
- महाराष्ट्र
- मराठवाडा
- खान्देश
- उत्तर महाराष्ट्र
- मुंबई
- नवी मुंबई
- ठाणे
- पुणे
- राष्ट्रीय
- आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- सामाजिक
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- व्हिडिओ
- E-Paper
- About Us
- Disclaimer
- Privacy Policy
- Contact Us
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
