Spread the love

खांदा व हाताला दुखापत; संशयिताविरुद्ध पोलिसांची कारवाई, तपास सुरू

जळगाव | जगदीश सपकाळे । तिनिधी

जुन्या वादातून नशिराबाद येथील भवानी नगर परिसरात एका ३२ वर्षीय तरुणावर लाकडी काठीने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या उजव्या खांद्याला व हाताला दुखापत झाली असून, नशिराबाद पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू सुपडू भोई (वय ३२, रा. भवानी नगर, नशिराबाद) हे ४ जुलै रोजी सकाळी सुमारे ७ वाजता परिसरात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्यावर लाकडी काठीने हल्ला करण्यात आला. या मारहाणीत त्यांच्या उजव्या खांद्याला आणि हाताला दुखापत झाली.

घटनेनंतर जखमी बापू भोई यांनी ७ जुलै रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून गणेश प्रकाश कोळी (रा. भवानी नगर, नशिराबाद) याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version