निगडी बसस्थानक परिसरात केळी, बुंदी लाडू, चहा-नाश्ता, रेनकोट व छत्रीचे वाटप; आमदार शंकर जगताप यांच्याकडून पालखी रथासाठी ११ हजारांची देणगी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने निगडी बसस्थानक परिसरात वारकरी बांधवांसाठी विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हजारो वारकऱ्यांना मोफत अन्नदान, वैद्यकीय सुविधा, औषधांचे वाटप तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेनकोट आणि छत्र्यांचे वितरण करण्यात आले.
या सेवा उपक्रमांतर्गत दोन ट्रक केळी, २५० किलो बुंदी लाडू, चहा-नाश्ता यांचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आमदार शंकरभाऊ जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सचिन काळभोर, सदाशिव खाडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार शंकरभाऊ जगताप यांनी संत तुकाराम महाराज पालखी रथासाठी ११ हजार रुपयांची देणगी अर्पण केली. कार्यक्रमाचे आयोजन भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमजान सनदी, रफिक शेख, राजू शेख, अक्षय सावंत, सुधीर भोसले, पप्पू हतागळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
