Spread the love

मुंबई शहर व उपनगरातील मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना संधी; २७ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुंबई | प्रतिनिधी

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या आणि २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी २७ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) यांच्या मुंबई शहर-उपनगर जिल्हा कार्यालयाने केले आहे.

या शिष्यवृत्तीसाठी मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी आणि मादिगा या १२ पोटजातींतील इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी पात्र असतील.

अर्जासोबत जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा आदी कागदपत्रांच्या दोन प्रती जोडणे आवश्यक आहे.

पूर्ण अर्ज स्वतःचा संपूर्ण पत्ता आणि भ्रमणध्वनी क्रमांकासह जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रूम क्र. ३३, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०००५१ या पत्त्यावर २७ जुलै २०२६ पूर्वी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version