Spread the love

वैदू वाडा-कुंभार वाडा परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

धरणगाव | प्रतिनिधी – वाल्मिक पाटील

धरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील वैदू वाडा व कुंभार वाडा परिसरात असलेले जीर्ण मटण मार्केट तातडीने अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी प्रभागाचे नगरसेवक गुलाबराव मराठे यांनी केली आहे. या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मटण मार्केटची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे वैदू वाडा, कुंभार वाडा तसेच आसपासच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मटण मार्केटचे तात्काळ स्थलांतर करणे आवश्यक असल्याचे नगरसेवक गुलाबराव मराठे यांनी म्हटले आहे.

यावेळी नगरसेविका अंजली विसावे यांच्यासह इतर नगरसेवकांनीही या मागणीला पाठिंबा देत प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

निवेदन देताना नगरसेवक किशोर कंखरेकडू बयसचेतन जाधव तसेच अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मटण मार्केट स्थलांतरित झाल्यास परिसरातील स्वच्छता, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version