Spread the love

नशिराबाद: नशिराबाद शहरातील प्रभाग क्र. १ ते ५ मधील नागरिकांसाठी आज एक विशेष (SIR) नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत सुरू राहणार असून, याद्वारे नागरिकांना विविध सरकारी सेवांचा लाभ घेता येणार आहे.

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात येत आहे.

आवश्यक कागदपत्रे:
शिबिरस्थळी येताना नागरिकांनी खालील मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे:
१. आधार कार्ड [Redacted]
२. मतदान ओळखपत्र
३. पासपोर्ट आकाराचे फोटो
४. मोबाईल क्रमांक
५. इतर संबंधित आवश्यक कागदपत्रे

शिबिराची ठिकाणे: नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत:
* *प्रभाग क्र. १:* किरण चौधरी यांच्या घराजवळ
* *प्रभाग क्र. २:* श्री कृष्ण मित्र मंडळ जवळ
* *प्रभाग क्र. ३:* फ्रुटसेल चौक
* *प्रभाग क्र. ४:* पीर यासिन मिया दर्गा परिसर
* *प्रभाग क्र. ५:* ग्रामपंचायत कार्यालय जवळ
तरी प्रभाग क्र. १ ते ५ मधील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह संबंधित ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version