यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर सायंकाळी ६ वाजता आयोजन
यशवंतराव चव्हाण मुंबई | प्रतिनिधी
भीम आर्मीचे प्रमुख तथा आजाद समाज पार्टी (कांशीराम)चे राष्ट्रीय नेते आणि खासदार अॅड. चंद्रशेखर आजाद यांची आज (शनिवार) सायंकाळी ६ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत सामाजिक न्याय, संविधान, दलित-बहुजन समाजाशी संबंधित विविध प्रश्न तसेच समकालीन राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर अॅड. चंद्रशेखर आजाद मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, आयोजकांनी नागरिकांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
