Spread the love

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार बैठक; सामाजिक कार्यकर्त्यांना सहभागाचे आवाहन

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीचे निर्देश दिले असून, विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहावेत, यासाठी आदिवासी टायगर सेना च्या वतीनेही संबंधित विभागांना निवेदन देण्यात आले आहे.

बैठकीत आदिवासी समाजाच्या विविध समस्या मांडून त्यावर चर्चा होणार असल्याने समाजातील जाणकार, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिनिधींनी उपस्थित राहून आदिवासी बांधवांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकर्ते पंढरीनाथ मोरे यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version