Spread the love

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; शिक्षणाला प्रोत्साहन देणारा उपक्रम

धरणगाव | प्रतिनिधी

धरणगाव तालुक्यातील साकरे येथे भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय (शासन मान्यता प्राप्त) यांच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या उपक्रमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.

यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष चंदन पाटील यांच्यासह पंढरीनाथ पाटील, सुधाकर पाटील, संजय पाटील, घनश्याम पाटील, किशोर पाटील, गोकुळ गुजर, प्रवीण बाविस्कर, विंदल नाईक, राहुल गुजर, रमेश पाटील, विशाल पाटील, निंबा बाविस्कर, रवींद्र सोनार, खुशाल पाटील, अनिल पाटील, जीभाऊ पाटील आणि बाळू बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षणासाठी समाजाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version