योगेश पाटील यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती; विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
भुवनेश्वर दुसाने पाचोरा | प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष तसेच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर आंदोलनाचे प्रमुख नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत देवगिरी प्रांतातील अनेक कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद–राष्ट्रीय बजरंग दलात जम्बो प्रवेश केला.
या कार्यक्रमात पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ पाटील यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच भूपेंद्र नंदलाल बेलदार यांच्याकडे सोशल मीडिया प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
याशिवाय खुशी दिदी (प्रवीण गरुड) यांची किन्नर आखाडा प्रमुख, मृत्युंजय गायकवाड यांची ओजस्विनी महिला तालुकाप्रमुख, तर नितीन वाकोडे, बंटी पाटील, सागर पाटील, गौरव पाटील, आदेश पाटील आणि जय बागुल यांची शहर मंत्री म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.
तसेच भूषण कुंभार, कृष्णा पाटील, संदीप भाऊ चौधरी, रोहित पाटील आणि सोपान शिंपी यांची सहमंत्री म्हणून निवड करण्यात आली. सोयगाव प्रखंडातून आप्पा भाऊ वाघ आणि ईश्वर भाऊ सपकाळे, भडगाव शहरातून भद्रा भाऊ माळी व बंटी धनगर, तसेच एरंडोल प्रखंडातून चेतन भाऊ चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संघटनेत प्रवेश केला.
या कार्यक्रमाला प्रवीण कोळी (राष्ट्रीय बजरंग दल, जळगाव जिल्हा मंत्री), महंत कमल गिरी महाराज (नागा बाबा आखाडा), राहुल सुनील चौधरी (राष्ट्रीय बजरंग दल, जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष), अविनाश कुलकर्णी (आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद–राष्ट्रीय बजरंग दल, देवगिरी प्रांत, जळगाव जिल्हा सहमंत्री), संतोष भाऊ सोनवणे (४० गाव तालुका उपाध्यक्ष) तसेच रोशनी छझलाने (ओजस्विनी महिला आघाडी) यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी संघटन विस्तार, सामाजिक कार्य आणि हिंदुत्ववादी विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
