Spread the love

ग्रामपंचायत कार्यालयात जयंतीनिमित्त साध्या व श्रद्धापूर्ण वातावरणात कार्यक्रम

अजय बाविस्कर  भवरखेडे (ता. धरणगाव) | प्रतिनिधी

भवरखेडे (ता. धरणगाव) येथे दिनांक २२ जुलै रोजी भवरखेडे ग्रामपंचायत कार्यालयात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विकासाची दूरदृष्टी असलेले आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी कटिबद्ध असणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात अत्यंत साध्या व श्रद्धापूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या वतीने दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version