Spread the love

एसआयआर (SIR) मोहिमेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

कल्याणे होळ जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना सन्मानपत्र प्रदान; उल्लेखनीय कार्याचा गौरव

विनोद मोरे कल्याणे होळ जळगाव | प्रतिनिधी

एसआयआर (SIR) मोहिमेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कल्याणे होळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. राहुल सोनवणे यांचा जिल्हाधिकारी घुगे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

हा सन्मान त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, परिश्रम आणि प्रशासनातील उल्लेखनीय योगदानाची दखल म्हणून प्रदान करण्यात आला.

राहुल सोनवणे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही त्यांनी अशीच उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे, गावाचे आणि जिल्ह्याचे नाव अधिक उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version