मतदार यादी पुनःनिरीक्षण मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी; नवलभाऊ पारधी यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव
पोखरी तांडा येथील भाग क्रमांक २५३ मध्ये ९०० मतदारांचे मॅपिंग पूर्ण; जवळपास शंभर टक्के उद्दिष्ट साध्य
पोखरी तांडा तालुक धरणगाव | प्रतिनिधी
मतदार यादी पुनःनिरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पोखरी तांडा (ता. धरणगाव) येथील भाग क्रमांक २५३ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवसेना पक्षाचे बीएलए नवलभाऊ पारधी यांचा जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी गौरव केला.
या मोहिमेत बीएलए नवलभाऊ पारधी आणि बीएलओ रवींद्र भाउसिंग पाटील यांनी एकूण ९०६ मतदारांपैकी ९०० मतदारांचे मॅपिंग पूर्ण करत जवळपास शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. मतदारसंघात सर्वप्रथम ही उल्लेखनीय कामगिरी केल्याची नोंद झाली.
या उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नवलभाऊ पारधी यांचे अभिनंदन करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
