Spread the love

जिल्हा बँक प्रकरण तापले; पोलीस बंदोबस्त वाढवला, कॉलनीत बॅरिकेड्स

JDCC संजय पवार यांचा दावा – टेंडर फॉर्ममध्येच कर्मचारी वेतनासह सर्व देणी नमूद, दिशाभूल केल्याचा आरोप

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित प्रकरणावरून वातावरण तापले असून, सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच कॉलनी परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

दरम्यान, JDCCचे संजय पवार यांनी जिल्हा बँकेचा कर्मचारी वेतन व इतर देणी यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे केलेले वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याचा आरोप केला आहे.

संजय पवार यांनी म्हटले की, संबंधित टेंडर फॉर्ममध्येच कर्मचारी वेतनासह इतर सर्व देणी स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे बँकेचा या देण्यांशी संबंध नसल्याचे सांगणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रकरणामुळे जिल्हा बँकेच्या व्यवहारांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version