धुळेच्या डॉ. जितेंद्र जवराज यांना प्रतिष्ठेचा ‘महा अक्युपंक्चर रत्न पुरस्कार-2026’
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचा गौरव; वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
धुळे | प्रतिनिधी
धुळे येथील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट व अक्युपंक्चरिस्ट डॉ. जितेंद्र नामदेव जवराज यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AGMA)च्या वतीने ‘महा अक्युपंक्चर रत्न पुरस्कार-2026’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार 19 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अक्युपंक्चर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आणि रुग्णसेवेत केलेल्या कार्याची दखल घेत डॉ. जवराज यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने अक्युपंक्चरिस्ट, वैद्यकीय तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट अभिनेते डॉ. सुयोग गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, ॲड. दत्तात्रय जाधव आणि ॲड. नागेश सोनुने उपस्थित होते.
यावेळी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे चेअरमन डॉ. करोळे, व्हाइस चेअरमन डॉ. नितीन राजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, डॉ. अभिजित कवडकर, प्रशांत सावंत, सौ. चव्हाण, डॉ. राजेंद्र गोऱ्हे तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. जितेंद्र जवराज यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक संस्था, सहकारी डॉक्टर, मित्रपरिवार आणि रुग्णांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
