Spread the love

धुळ्यात २१ फुटी शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना; शिवप्रेमींमध्ये उत्साह, उद्घाटन लवकरच

आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेला मूर्त रूप; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्मारकाच्या कामाला वेग

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरातील आग्रा रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या २१ फुटी भव्य पुतळ्याची मंत्रोच्चारात आणि जल्लोषात स्थापना करण्यात आली. आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्याला शिवप्रेमी, भाजप पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला हा भव्य पुतळा लवकरच नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत त्यांनी “सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं” असे म्हणत विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली.

शिवस्मारकाच्या कामाला काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली होती. मात्र स्मारकाच्या परिसरात कार्यालय उभारण्यात येत असल्याचा आरोप करत विरोधकांनी न्यायालयात धाव घेतल्याने कामाला स्थगिती मिळाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती उठविण्यात आल्याचा दावा करत आज पुतळ्याची स्थापना करण्यात आली.

या सोहळ्याला आमदार अनुप अग्रवाल, अल्पा अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, महानगराध्यक्ष गजेंद्र आंपळकर, महादेव परदेशी, डॉ. माधुरी बोरसे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version