Spread the love

‘जंतर-मंतरचा आक्रोश’ : शिक्षण व्यवस्थेवरील प्रश्न आणि संसदीय घडामोडींवर काव्यात्मक भाष्य

प्रा. पि. जी. भद्रे यांच्या कवितेतून विद्यार्थी आंदोलन, शिक्षण व्यवस्था आणि लोकशाही प्रक्रियेवर भाष्य

पुणे प्रतिनिधी

प्रा. पि. जी. भद्रे यांनी रचलेल्या ‘जंतर-मंतरचा आक्रोश’ या कवितेतून शिक्षण व्यवस्था, विद्यार्थी आंदोलन आणि संसदीय घडामोडींवर काव्यात्मक भाष्य करण्यात आले आहे.

कवितेत शिक्षण व्यवस्थेतील समस्यांवर आवाज उठवण्यासाठी झालेल्या आंदोलनांचा उल्लेख करत, आंदोलनकर्त्यांच्या संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. तसेच जंतर-मंतरवरील आंदोलन, संसदेतील कामकाज आणि लोकशाही प्रक्रियेबाबत कवीने आपल्या भावना काव्यरूपाने व्यक्त केल्या आहेत.

या कवितेत शासन, विरोधक आणि संसदीय चर्चेच्या संदर्भातील विविध प्रतिमा व प्रतीकांचा वापर करून सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे. विद्यार्थी प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा आणि लोकशाहीत संवादाचे महत्त्वही कवितेत अधोरेखित करण्यात आले आहे.

जंतर-मंतरचा आक्रोश

ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेला
सुधारण्यासाठी जण आंदोलन अण् अमरण उपोषण
केली पण जाग ना आली सरकारला
जंतर – मंतरचा जालीयनवाला बाग झाली
तरीही धन ना लागली सरकारला ..!

तरूणांनी काठ्या खाल्या लाठा झेलल्या
पाठीवरती वार झेलले कैक तरूण ठार झाले
शासनदरबार सुस्त होत
जाग ना आली सरकारला…!

संसदेच्या सभागृहात चालू होत अधिवेशन
ज्वलंत प्रश्न सोडून मागे देत होते अभिभाषण
बुजगावण्यासम सभाध्यक्ष बसला होता आसणावर
कुणाचेच लक्ष नव्हते प्रधानमंत्र्यांच्या भाषणावर

विरोधकांनी प्रश्न करताच अध्यक्षांची बेल झाली
सत्ताधा-यांना धारेवर धरताच
कामकाजाची सभा काही वेळ तहकूब केली
सभागृहाबाहेर ज्वलंत प्रश्न घेवून मोर्चेकरू पेटले
ज्वलंत प्रश्न मागेच राहिले
तारांकित प्रश्न मात्र सुटलेले…

— प्रा. पि. जी. भद्रे
7972683559

Share.
Leave A Reply

Exit mobile version