Spread the love

नशिराबाद नगरपरिषदेतर्फे उद्या सर्वसमावेशक एसआयआर (SIR) शिबिराचे आयोजन; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

प्रभाग १ ते १० मधील नागरिकांसाठी एकाच छताखाली २५ बीएलओ उपलब्ध; मतदार सेवा सुलभ होणार

नशिराबाद :
नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांसाठी एका विशेष *एसआयआर (SIR) शिबिराचे* आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, नगरपरिषद हद्दीतील सर्व *२५ बी.एल.ओ. (Booth Level Officers)* आणि त्यांचे सहाय्यक एकाच ठिकाणी एकाच छताखाली नागरिकांच्या उपलब्ध असणार आहेत.

मतदार नोंदणी, नाव फेरफार, दुरुस्ती किंवा इतर संबंधित कामांसाठी नागरिकांची होणारी पायपीट थांबावी आणि त्यांना एकाच ठिकाणी सर्व service मिळाव्यात, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराची सविस्तर माहिती
दिनांक:* रविवार, दिनांक २६ जुलै २०२६
वेळ:* सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत
स्थळ:* उर्दू शाळा, नाईकवाडा, नशिराबाद
नशिराबाद नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग १ ते १० मधील सर्व सुजाण नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, अशी नम्र विनंती नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version