Spread the love

जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी सुनिल भंगाळे यांची बिनविरोध निवड

पारोळ्याचे नगरसेवक मनीष पाटील यांची जिल्हा कार्यकारिणीत बिनविरोध निवड; तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ

पारोळा | प्रतिनिधी : संदीप पाटील

जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी लोकप्रिय, कर्तृत्ववान आणि गतिशील नेतृत्व म्हणून ओळख असलेले सुनिल भंगाळे यांची सभासदांच्या एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. ही सभा रविवारी (दि. २६ जुलै) केमिस्ट भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

यावेळी उपाध्यक्षपदी संदीप बेदमुथा तर कोषाध्यक्षपदी दिनेश मालू यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच पारोळा येथील नगरसेवक मनीष पाटील यांची जिल्हा कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाल्याने पारोळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान भानुदास नाईकसुरेंद्र बोहरा (पारोळा) आणि अशोक जैन यांनी निवडणूक अधिकारी व मार्गदर्शक म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी राहणार आहे.

सुनिल भंगाळे यांनी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत जिल्हा केमिस्ट संघटनेच्या कार्याला सातत्याने दिशा दिली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य आणि प्रभावी कार्यपद्धतीमुळे त्यांनी जिल्ह्यासह राज्यस्तरावरही वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव विविध पुरस्कारांनी करण्यात आला आहे.

सुनिल भंगाळे यांच्या अध्यक्षपदी झालेल्या बिनविरोध निवडीबद्दल जिल्ह्यातील केमिस्ट बांधव, संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version