Spread the love

बेटावदच्या श्री. एफ. एम. ललवाणी विद्यालयाचा विद्यार्थी असद मन्यार शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी १९६ गुण; विद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा

बेटावद | वार्ताहर :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) २०२६ च्या निकालात बेटावद येथील श्री. एफ. एम. ललवाणी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी असद रईस मन्यार याने उल्लेखनीय यश संपादन करत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला आहे.

असदने या परीक्षेत ३०० पैकी १९६ गुण (६५.३३ टक्के) मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. त्याने प्रथम भाषा व गणित या विषयांमध्ये १०६ गुण, तर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विभागात ९० गुण मिळवले.

असदच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version