Spread the love

पाळधीत गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन; विविध धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल

२९ जुलै रोजी श्रीराम मंदिरात महर्षी व्यास पूजन, संत संदेश, नामजप, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके व मार्गदर्शनाचा कार्यक्रम

पाळधी (ता. धरणगाव) | प्रतिनिधी :
पाळधी येथील श्रीराम मंदिरात बुधवार, २९ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, विविध धार्मिक, प्रबोधनपर आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास आणि गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून होणार आहे. त्यानंतर संत संदेशधर्मसेवकांचे अनुभव कथनरामराज्य स्थापनेचा संकल्पनामजप, तसेच धर्मरक्षकांचा सत्कार आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम होईल.

यावेळी स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार असून, परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्यावर आधारित लघुपटही उपस्थितांना दाखविण्यात येणार आहे.

तसेच ‘रामराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा’ या विषयावर साधकांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version