Spread the love

पाळधी वन उद्यानातील पर्यटन विकास कामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध सुविधा उभारण्याच्या सूचना; शाश्वत विकासावर भर

विनोद मोरे कल्याणे होळ प्रतिनिधी | 
जळगाव वन विभागांतर्गत वनपरिक्षेत्र येथील एकलग्न पाळधी वन उद्यानाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सुरू असलेल्या पर्यटन विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी वन उद्यानाचा पर्यावरणपूरक, शाश्वत आणि पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यावर भर देण्यात आला.

पाहणीदरम्यान पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उभारण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या. पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत पर्यावरणाचे संवर्धन करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

पर्यटन विकासासाठी पुढील सुविधा विकसित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत :

  • पर्यावरणपूरक कॅन्टीन व फूड कोर्ट

  • सायकलिंग ट्रॅक आणि वॉकिंग ट्रॅक

  • मुलांसाठी निसर्गाधारित खेळ क्षेत्र

  • बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा व स्वच्छतागृहे

  • जैवविविधता माहिती केंद्र (Interpretation Centre) आणि माहिती फलक

  • सौरऊर्जेवर आधारित प्रकाशयोजना व पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापन

या विकासकामांमुळे एकलग्न पाळधी वन उद्यान पर्यटकांसाठी अधिक आकर्षक ठरण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, निसर्ग पर्यटन आणि स्थानिक विकासालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version