पाचोरा तालुक्यातील पहाण गावात नदी व रस्त्यामध्ये तफावत आणि धरणाच्या पाण्यामुळे निर्माण झाली बिकट परिस्थिती; शेतकरी, कामगार व मजुरांचे जनजीवन विस्कळीत.
पहाण, तालुका पाचोरा —वाल्मीक जाधव प्रतिनिधी :
पहाण गावामध्ये गावामध्ये घुसण्यासाठीच बऱ्याच दिवसापासून नागरिकांमध्ये पूल करण्यात यावा या मागणीसाठी अनेक वेळा पाठपुरा करून देखील शासनाने दुर्लक्ष केल्या असल्यामुळे आज शेतकरी कामगार मजूर गेल्या दोन दिवसापासून घराबाहेर देखील निघाले नाहीत कारण संपूर्ण गावाला पावसाच्या पुराने वेढलेले आहे.
त्यामुळे गावकरी शेतामध्ये जाऊ शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे कारण जवळपास रोड आणि नदीचे अंतर २० ते ३० फूट खाली असल्यामुळे आणि पहाण मोहाडी शिवारामध्ये वरती धरण असल्यामुळे पाणी पाण्याचा निपसारा होत नसल्यामुळे संपूर्ण गावाला पाणी पुराने वेढलेले आहे तरी याकडे शासनाने लक्ष देऊन तात्काळ उपयोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
