Spread the love

वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्यांचा गौरव, महापुरुषांच्या विचारांचा दिला प्रेरणादायी वारसा

प्रतिनिधी :

न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महापुरुषांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रविण महाजन सर होते. यावेळी मंगला पिंगळे, वंदना चौधरी आणि वैशाली पाचपांडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, राष्ट्रनिर्मितीतील कार्य आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव यावर प्रभावी भाषणे सादर केली. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी वंदना चौधरी यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला, तर वैशाली पाचपांडे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक बांधिलकी आणि देशकार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेच्या लहान गटात इयत्ता पहिलीतील पाटील उपासना किरण आणि इयत्ता दुसरीतील बार्हे तन्वी राकेश यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मोठ्या गटात इयत्ता तिसरीतील चौधरी ईशा विक्रम तसेच इयत्ता चौथीतील घोडकर हर्षिता सचिन आणि चव्हाण गितेश आनंदा यांनी प्रथम क्रमांक मिळवून विशेष कौतुकास पात्र ठरले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वंदना चौधरी, पुजा पाटील, आशा इसाने आणि जयश्री चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत महापुरुषांचे विचार जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version