Spread the love

विश्वास आरोटे यांच्या हस्ते पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण; पत्रकार संघटनात्मक बळकटीवर भर

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखेच्या छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा विभाग) पदाधिकाऱ्यांनी सीजेपीचे अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत आगामी पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रणपत्र प्रदान केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंतज्येष्ठ पत्रकार मधुकर वैद्यजिल्हाध्यक्ष छबुराव ताके आणि जिल्हा सरचिटणीस सुजित ताजने उपस्थित होते.

याप्रसंगी विश्वास आरोटे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची वाटचाल, उद्दिष्टे तसेच पत्रकारांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यानंतर अभिजीत दिपके यांचा पुष्पगुच्छ आणि श्री साईबाबांची मूर्ती देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना आगामी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले.

यावेळी पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. उपस्थितांनी पत्रकारांच्या हितासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version