Spread the love

जळगावातून ईरफान बागवान बेपत्ता; माहिती देण्याचे कुटुंबीयांचे आवाहन

३१ जुलैपासून घरातून निघून परतले नाहीत; शोधासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची विनंती

शिंदखेडा / जळगाव | प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील मूळ रहिवासी तथा सध्या जळगाव शहरातील बागवान गल्ली परिसरात वास्तव्यास असलेले ईरफान बागवान हे ३१ जुलै २०२६ रोजी घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडले असून, त्यानंतर ते अद्याप घरी परतलेले नाहीत.

कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच संभाव्य ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, अद्याप त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण असून, नागरिकांनी शोधकार्यात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ईरफान बागवान यांच्याबाबत कोणाला कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठे दिसल्यास तातडीने खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे कुटुंबीयांनी विनंती केली आहे.

संपर्क :
असफाक बागवान – ९४२२५५५५२३

ईरफान बागवान यांच्याबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यातही माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version