Spread the love

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या; शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

महसूल व कृषी विभागामार्फत त्वरित पंचनाम्यांची मागणी; जनावरांच्या नुकसानीसाठीही मदतीची अपेक्षा

भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ

भडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे, फळबागांचे तसेच जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी आणि महसूल व कृषी विभागामार्फत त्वरित पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी संघटना, भडगाव यांच्या वतीने नायब तहसीलदार अनिल भामरे तसेच तालुका कृषी अधिकारी दिपक ठाकूर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उभी पिके, फळबागा आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी.

तसेच ज्या शेतकऱ्यांचे जनावरे दगावली किंवा अन्य प्रकारचे नुकसान झाले आहे, त्यांनाही शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

महसूल, कृषी व संबंधित विभागांनी संयुक्त सर्वेक्षण करून तातडीने पंचनामे पूर्ण करावेत आणि मदतीचे प्रस्ताव कोणताही विलंब न लावता शासनाकडे पाठवावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून शासनाने त्वरित निर्णय घेतल्यास अतिवृष्टीग्रस्त शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेने व्यक्त केली.

यावेळी शेतकरी संघटना, भडगावचे तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील, उपाध्यक्ष वाल्मिक लोंखंडेरामकृष्ण माळीडॉ. योगेश गोसावीलीलाधर पाटीलसंजय खैरनारयोगेश पाटीलमिथुन परदेशीगौतम अहिरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version