Spread the love

मोहाडी उपनगरात वर्षावास प्रवचनमालेचे दुसरे पुष्प संपन्न; ‘बोधिसत्त्व सिद्धार्थ गौतमांचा जन्म आणि प्रव्रज्या’ विषयावर मार्गदर्शन

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजन; बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, सामूहिक त्रिशरण-पंचशील व खिरदानाने कार्यक्रमाची सांगता

धुळे | प्रतिनिधी

भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा धुळे यांच्या वतीने आषाढ ते अश्विन पौर्णिमेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास प्रवचनमालेतील दुसरे प्रवचन पुष्प मोहाडी उपनगर येथील शांतीदूत बुद्ध विहारात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. रामराजे परिवाराच्या पुढाकारातून आयोजित या धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रमाला धम्म उपासक-उपासिका आणि प्रबुद्ध नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते आप्पासाहेब एस. यू. तायडे होते. प्रमुख अतिथी म्हणून सुरेश आण्णा लोंढे (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), महेंद्र आण्णा महाले (धुळे जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), ज्येष्ठ बौद्धाचार्य पोपटराव मोहितेभटूभाऊ वाघप्रसेनजीत चव्हाणअरुणाताई रामराजेनौसरबाई जाधवसुहास रामराजेकरिष्माताई रामराजेमयुरी जाधवहर्ष मोरेचंदाताई केदारअनिल केदार आणि काजलताई केदार उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर धम्म उपासिका यशोदाताई सपकाळ यांनी ‘बोधिसत्त्व सिद्धार्थ गौतमांचा जन्म आणि प्रव्रज्या’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी भगवान बुद्धांच्या जीवनप्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पे, त्याग, करुणा आणि मानवकल्याणाचा संदेश यावर प्रकाश टाकत उपस्थितांना धम्माचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी भानुदास भवरेयशोदाताई बागुलनानाजी अहिरेभगवान वाघविनोद केदारउत्तरेश्वर गायकवाडराहुल मोरेसुनील मोरेभारत खैरनार यांच्यासह नीलिमा भामरेवरुण जाधवपृथ्वीराज जाधवआर्यन रामराजेवंश केदारसुमित घोडसेसंदीप घोडसेदुर्गेश वानखेडेराजरत्न वाघदीपक वानखेडेसंगीता खैरनारवसंत नेरकरअक्काबाई खैरनार तसेच प्रबुद्ध भारत मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने धम्म उपासक-उपासिका उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य अशोकभाऊ शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करून करण्यात आली. यानंतर रामराजे परिवाराच्या वतीने उपस्थितांसाठी फलाहार आणि खिरदानाचे वितरण करण्यात आले.

वर्षावास प्रवचनमालेच्या माध्यमातून समाजात धम्म, नैतिक मूल्ये आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आगामी प्रवचनांनाही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version