कोमल भदाणे यशस्वी; एम. फार्मसी परीक्षेत विद्यापीठात तृतीय क्रमांक
बोराडी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशनचा १०० टक्के निकाल; विद्यार्थ्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक
पाचोरा | प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या मे-जून २०२६ च्या एम. फार्मसी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, किसान विद्या प्रसारक संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन, बोराडीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाने यंदाही शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत प्रथम वर्ष एम. फार्मसीचा शंभर टक्के निकाल लावला आहे.
या परीक्षेत कोमल दिपक भदाणे हिने ८०.७७ सीजीपीए गुण मिळवत विद्यापीठात तृतीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे महाविद्यालयासह पाचोरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता हे महत्त्वाचे घटक असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष शशांक रंधे, नगरसेवक रोहित रंधे, प्राचार्य डॉ. विकास पाटील, उपप्राचार्य डॉ. कल्पेश वाघ, तसेच संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कोमल भदाणे या पाचोरा येथील लक्ष्मण विजय सागर यांच्या सून असून, पी. के. शिंदे प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका सौ. मंगला लक्ष्मण सागर यांच्या त्या सून आहेत. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
