Spread the love

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्याची मागणी;

जंतर-मंतरवर आंदोलन

पारोळा | प्रतिनिधी

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्यात यावे, या मागणीसाठी नामांतर संघर्ष समिती, विविध लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले.

या आंदोलनानंतर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू किंजरापु यांच्या उपस्थितीत तसेच लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहभागाने संघर्ष समितीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीत विमानतळाच्या नामांतराच्या मागणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी लोकभावनांचा आदर राखून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी केंद्र सरकार या मागणीबाबत सकारात्मक असून, योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

बैठकीला खासदार नरेश म्हस्केसुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रेनिलेश लंकेबजरंग सोनवणेधैर्यशील पाटील यांच्यासह नामांतर संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्य मुद्दे

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्याची मागणी.

  • दिल्लीतील जंतर-मंतर येथे नामांतर संघर्ष समितीचे आंदोलन.

  • केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांसोबत संघर्ष समितीची बैठक.

  • लोकभावनांचा आदर राखून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन.

Share.
Leave A Reply

Exit mobile version