Spread the love

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची पुनर्नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा विश्वास; ‘गो-१० व्हिजन’द्वारे आयोगाला देशातील आदर्श संस्थेचे स्थान मिळवून देण्याचा निर्धार

पारोळा | प्रतिनिधी (सुरेश पाटोळे)

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा मागील कार्यकाळ ६ जुलै २०२६ रोजी पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाने शेखर मुंदडा यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत त्यांची महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या नियुक्तीस मंजुरी दिली.

पुनर्नियुक्तीनंतर शेखर मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन विश्वास व्यक्त केल्याबद्दल आभार मानले. आगामी कार्यकाळात राज्यातील गोसंवर्धनाच्या कार्याला अधिक गती देण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकृत नियुक्ती अधिसूचनेची प्रत देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्रातील गोसंवर्धन, गोशाळांचे सक्षमीकरण आणि गो-आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प मुंदडा यांनी व्यक्त केला.

‘गो-१० व्हिजन’द्वारे आयोगाला राष्ट्रीय स्तरावर आदर्श बनविण्याचा संकल्प

शेखर मुंदडा यांनी सांगितले की, पुढील तीन वर्षांत **‘गो-१० व्हिजन’**च्या माध्यमातून महाराष्ट्र गोसेवा आयोगाला देशातील सर्वोत्कृष्ट आणि आदर्श आयोग म्हणून विकसित करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने कार्य केले जाईल. देशी गोवंशाचे संरक्षण, संवर्धन, संगोपन, गोशाळांचे सक्षमीकरण आणि गो-आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी हा कार्यकाळ पूर्णपणे समर्पित असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुनर्नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार व्यक्त करत मुंदडा म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी केवळ पदाचा नसून महाराष्ट्रातील गोसेवा चळवळीला अधिक उंचीवर नेण्याची एक पवित्र जबाबदारी आहे.”

Share.
Leave A Reply

Exit mobile version