Spread the love

तलाठ्यांची मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती; समुपदेशनाद्वारे पदस्थापना प्रक्रिया पूर्ण

जळगाव जिल्ह्यात उर्वरित तीन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश; नागरिकाभिमुख व पारदर्शक प्रशासनावर भर

जळगाव | प्रतिनिधी (विनोद मोरे)

महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांची मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. विभागीय पदोन्नती समितीच्या निर्णयानुसार निवड झालेल्या उर्वरित तीन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीत समुपदेशनाद्वारे पदस्थापना करून पदोन्नतीचे आदेश देण्यात आले.

समुपदेशन प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या नव्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यात आली. नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि वेळेवर सेवा देण्यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत नव्या जबाबदाऱ्यांचे प्रभावीपणे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच महसूल विभागातील कामकाज अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याच्या सूचना दिल्या.

महसूल प्रशासनाची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने ही पदोन्नती प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version