Spread the love

मतदारांसाठी दिलासादायक निर्णय; ‘SIR’ विशेष संक्षिप्त पुनरीक्षण उपक्रमास १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मतदार नोंदणी व गणना अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त वेळ; सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई | प्रतिनिधी (हर्षल पाटील)

भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) २०२६ अभियानांतर्गत मतदारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. गणना अर्ज (Enumeration Form) सादर करण्याची मुदत आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

यामुळे अद्याप मतदार नोंदणी, दुरुस्ती किंवा गणना अर्ज सादर न केलेल्या पात्र नागरिकांना आपली माहिती वेळेत सादर करण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

सुधारित वेळापत्रक

  • बीएलओमार्फत गृहभेटी: ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६

  • प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन: २४ ऑगस्ट २०२६

  • दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी: २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६

  • दावे-हरकतींची सुनावणी व निकाल: २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६

  • अंतिम मतदार यादीचे प्रकाशन: २७ ऑक्टोबर २०२६

ऑनलाइन तपासणीची सुविधा

मतदारांना आपली माहिती तपासण्यासाठी तसेच अर्ज प्रक्रियेसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिक ECINET App किंवा भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवरील “Search Your Name in Last SIR” या सुविधेचा वापर करून मागील SIR मतदार यादीतील आपली नोंद तपासू शकतात. प्रशासनाने सर्व पात्र नागरिकांना मुदतवाढीचा लाभ घेऊन मतदार यादीतील नोंदणी, दुरुस्ती किंवा आवश्यक माहिती वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version