Spread the love

MPSC मधून सहाय्यक आयुक्तपदी निवड; रावेर तहसीलमधील पुरवठा निरीक्षक डाळिंबी सरोदे यांना भावपूर्ण निरोप

कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम; सहकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

रावेर | प्रतिनिधी

रावेर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक कु. डाळिंबी रवींद्र सरोदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळवत सहाय्यक आयुक्त (विक्रीकर) पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला.

पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असताना कु. सरोदे यांनी कर्तव्यनिष्ठा, कार्यतत्परता आणि नागरिकांशी जपलेला आपुलकीचा संवाद यामुळे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या प्रशासकीय सेवेतील योगदानाचा गौरव करत सहकाऱ्यांनी त्यांना पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रभारी तहसीलदार संजय तायडे आणि नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर मिळविलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

कु. डाळिंबी सरोदे यांनीही आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

समारंभाच्या शेवटी त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Exit mobile version