Spread the love

सौ. उषाबाई गोविंदा पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

माळेगाव येथे आज अंत्यसंस्कार

सोयगाव | प्रतिनिधी

माळेगाव येथील रहिवासी सौ. उषाबाई गोविंदा पाटील यांचे शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

त्यांची अंत्ययात्रा शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून माळेगाव येथून निघाली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पती गोविंदा झावरू पाटील, मुलगे शिवाजी गोविंदा पाटील व दिनकर गोविंदा पाटील, तसेच समस्त अहिरे परिवार असा परिवार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

शोकाकुल :
गोविंदा झावरू पाटील – पती
शिवाजी गोविंदा पाटील – मुलगा
दिनकर गोविंदा पाटील – मुलगा
समस्त अहिरे परिवार, माळेगाव

Share.
Leave A Reply

Exit mobile version