शिरपूरमधून २५ वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू
फार्मसी कॉलेजमधून निघाल्यानंतर संपर्काबाहेर; नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरातील फार्मसी कॉलेजमधून भाग्यश्री मेहरबान जाधव (वय २५) या बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक ८९/२०२६ नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री जाधव या दि. १० जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता करवंद नाका येथील फार्मसी कॉलेजमधून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्या. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा समजू शकलेला नाही.
बेपत्ता महिलेचे वर्णन
भाग्यश्री जाधव यांची उंची सुमारे ५ फूट, रंग गोरा, केस लांब व काळे, डोळे मध्यम, चेहरा गोल, बांधा मजबूत आणि नाक बसके आहे. बेपत्ता होताना त्यांनी जांभळ्या रंगाची साडी व सोनरी रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. त्यांना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा बोलता येते.
त्यांच्याकडे मोबाईल क्रमांक ७९८४७७९४५९ असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा
याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दि. ११ जुलै २०२६ रोजी दुपारी २.०२ वाजता मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार राजेंद्र सुकलाल रोकडे (बक्कल क्र. १०८०) यांच्याकडे याबाबत नोंद आहे.
भाग्यश्री जाधव यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास ती तातडीने शिरपूर शहर पोलीस ठाण्याला कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
