सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दिल्लीत दखल
पुणे (शंकर जोग) : विनोद घिसुलाल सोळंकी या पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना दिल्ली येथे दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सामाजिक, आरोग्य, शिक्षण आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना मानद डॉक्टरेट पदवी तसेच महात्मा गांधी उत्कृष्टता सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्टार्टअप शिक्षा फाउंडेशन यांच्या वतीने सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी विनोद सोळंकी यांना Honorary Doctorate म्हणजेच सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. तसेच जीवरण फाउंडेशन यांच्या वतीने त्यांना महात्मा गांधी उत्कृष्टता सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
विविध क्षेत्रांतील कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल
विनोद सोळंकी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, कला, विज्ञान, आरोग्य, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी केलेल्या सेवाभावी उपक्रमांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. समाजहिताच्या कामांमधील त्यांची निष्ठा आणि योगदान लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावर हा सन्मान देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुणे शहरातून शुभेच्छांचा वर्षाव
दिल्ली येथे झालेल्या सन्मान सोहळ्यानंतर पुणे शहरातून विनोद सोळंकी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध सामाजिक संस्था, मित्रपरिवार आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या दुहेरी सन्मानामुळे पुणे शहराच्या सामाजिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजसेवेत कार्यरत तरुणांसाठी विनोद सोळंकी प्रेरणास्थान ठरत आहेत.
