प्रांजल नारायण पाटील यांची भुसावळ शहर कोषाध्यक्षपदी निवड
जळगाव : पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देत पर्यावरण संवर्धन व विकास समितीने भुसावळमध्ये युवा नेतृत्वाला प्रोत्साहन दिले आहे. समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशाने प्रांजल नारायण पाटील यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या भुसावळ शहर कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुखदेव लक्ष्मण भालेराव (पत्रकार), उत्तर महाराष्ट्र सचिव, भूगोल अभ्यासक व संशोधक प्रा. योगेश दिनकर गोसावी तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे (अप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य
प्रांजल पाटील हे वृक्षारोपण, जैवविविधता संवर्धन, पाणी बचत, पर्यावरण जनजागृती आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे युवा कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने आवाज उठवत जनजागृतीचे कार्य केले आहे.
भुसावळमध्ये पर्यावरण उपक्रमांना मिळणार गती
त्यांच्या निवडीमुळे भुसावळ शहर व तालुक्यात पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड, जलसंवर्धन आणि स्वच्छता अभियानासारख्या उपक्रमांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
प्रांजल पाटील यांच्या निवडीचे विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
