आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात रावेरमध्ये भव्य मोर्चा
हजारो भीमसैनिकांचा सहभाग; ऑल इंडिया पँथर सेनेचा जाहीर पाठिंबा
रावेर | प्रतिनिधी :
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात रावेर येथे समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते. आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चाला ऑल इंडिया पँथर सेनेच्या जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला. मोर्चादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
मोर्चाला ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील, उपजिल्हाध्यक्ष अजय शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय वाघ, जिल्हा महासचिव आदित्य गजरे, रावेर तालुकाध्यक्ष विनोद मोरे, युवा तालुकाध्यक्ष जितू इंगळे, उपाध्यक्ष श्रावण भालेराव, संघटक गणेश गाढे, कार्याध्यक्ष सागर ठाकरे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अतुल अटकाळे आणि सोशल मीडिया अध्यक्ष समीर गाढे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील पँथर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजामध्ये जनजागृती करून आपल्या मागण्यांसाठी पुढील काळातही आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जय भीम! जय संविधान! संविधान जिंदाबाद!
