शेतकरी संघटनेची भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर
अखिलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवी कार्यकारिणी; शेतकरी प्रश्नांसाठी संघटितपणे लढण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार
भडगाव | प्रतिनिधी गणेश रावळ : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने शेतकरी संघटनेची भडगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय विश्रामगृह, भडगाव येथे झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष अखिलेश रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
यावेळी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप दादा पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद धनगर, चाळीसगाव तालुकाध्यक्ष दिलीप पाटील तसेच लोकमतचे पत्रकार अशोक परदेशी उपस्थित होते.
तालुका कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
भडगाव तालुका कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी वाल्मीक प्रभाकर लोखंडे (बांबरुड प्र. उ.) व धनराज तुकाराम पाटील (पिचर्डे), तर कार्याध्यक्षपदी सतीश युवराज पाटील (गोंडगाव) यांची नियुक्ती करण्यात आली.
सचिवपदी डॉ. योगेश युवराज गोसावी (वाडे) यांची, तर सरचिटणीसपदी सरदारसिंग जयसिंग पाटील (वडधे), समाधान भगवान पाटील (वाक) व रामकृष्ण जगन्नाथ माळी (वाडे) यांची निवड करण्यात आली.
संघटकपदी संजय केशव खैरनार (बांबरुड प्र. उ.), तर चिटणीसपदी योगेश शालिक पाटील (बांबरुड प्र. उ.) व गणेश राजेंद्र जावरे (बात्सर) यांची नियुक्ती करण्यात आली.
युवक आघाडीचीही कार्यकारिणी जाहीर
शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी लिलाधर कल्याणराव पाटील (वाक) यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी सागर माधवराव पाटील (बांबरुड), सचिवपदी योगेश खुशाल पाटील (बात्सर), संघटकपदी विकी योगराज पाटील (वाक) तर सरचिटणीसपदी नरेंद्र संभाजी पाटील (वाक) यांची निवड करण्यात आली.
याशिवाय ज्येष्ठ संघटकपदी संजय वेलजी पाटील (पिचर्डे) व प्रकाश कोतकर, तर सदस्यपदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
शेतकरी प्रश्नांसाठी प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे, पात्र शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, पीक नुकसान, अतिवृष्टी, विमा, नुकसानभरपाई आणि इतर शेतीविषयक प्रश्नांवर आवाज उठविणे, तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शेतकरी संघटनेच्या नव्या कार्यकारिणीमुळे भडगाव तालुक्यातील शेतकरी प्रश्नांना अधिक संघटितपणे वाचा फुटेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
