वाघोदा बुद्रुक येथील शाळेची पाहणी; शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून स्वागत
रावेर | प्रतिनिधी : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिश्मा नायर यांनी रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट देत शाळेची पाहणी केली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता बडबुजर तसेच शिक्षक रामेश्वर कांदे, वैशाली चौधरी, रूपाली बोंडे यांच्यासह उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचे स्वागत केले.
भेटीदरम्यान नायर यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम व उपलब्ध सुविधांची पाहणी केली. तसेच शिक्षकांशी संवाद साधून शाळेतील शैक्षणिक कामकाजाची माहिती घेतली.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
