Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • Politics
  • Business
  • Technology
  • Buy Now
Home»पुणे»भोसरीत भाजपमध्ये उफाळला अंतर्गत संघर्ष
पुणे

भोसरीत भाजपमध्ये उफाळला अंतर्गत संघर्ष

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMarch 18, 2026Updated:March 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. पक्षातील दोन प्रमुख चेहरे – सचिन काळभोर आणि आमदार महेश लांडगे – यांच्यातील जुना संघर्ष आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र झाल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड महापालिकेत सात स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

‘आखाडा पार्टी’वरून सुरू झालेला वाद
विधानसभा निवडणुकीच्या काळात सचिन काळभोर यांनी आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या ‘आखाडा पार्टी’ कार्यक्रमालाही काळभोर यांनी जाहीर विरोध दर्शविला होता. भाजपची संस्कृती हिंदुत्ववादी असून दारू-मटणाच्या कार्यक्रमांशी तिचा संबंध नसल्याचे मत त्यांनी मांडले होते. या विरोधानंतर पुढील निवडणुकीत संबंधित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक पातळीवर चर्चेत आहे.

यानंतर चिखली येथील टाऊन हॉलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी गेले असताना काळभोर यांना धमकी दिल्याचा आरोपही पुढे आला होता. या घटनांमुळे दोन्ही नेत्यांमधील संघर्ष उघड झाला.

२०१७ पासून वाढलेली ताकद
प्रभाग क्रमांक १३ मध्ये २०१७ साली प्रथमच भाजपचे दोन नगरसेवक निवडून आले. त्यानंतर २०२६ मध्ये तीन नगरसेवक विजयी झाले. निगडी गावठाण आणि परिसरात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यात सचिन काळभोर यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. शहरातील पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी आंदोलने, मोर्चे व निवेदने देत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे त्यांची ओळख शहरात आक्रमक कार्यकर्ता म्हणून निर्माण झाली.

तिकीट नाकारले, तरी प्रचारात सक्रिय
निवडणुकीच्या वेळी आमदार लांडगे यांनी काळभोर यांना तिकीट देण्यास विरोध केल्याची चर्चा आहे. काळभोर यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली होती. मात्र स्थानिक पातळीवरील विरोधामुळे त्यांना संधी मिळाली नाही. तरीही त्यांनी अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी प्रचारात सहभाग घेतला. विशेष म्हणजे २०१४ मध्ये लांडगे अपक्ष उमेदवार असताना भाजपचे अधिकृत उमेदवार एकनाथ पवार यांच्या प्रचाराची धुरा निगडी भागात काळभोर यांनी सांभाळली होती. त्यानंतर दोघांमधील राजकीय मतभेद वाढत गेल्याचे बोलले जाते.

स्वीकृत नगरसेवक पदावरून तणाव
आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत सात स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. या पदासाठी सचिन काळभोर इच्छुक असून त्यांनी शहर भाजपमार्फत दावा केला आहे. मात्र आमदार लांडगे यांनी त्यांच्या नियुक्तीला उघडपणे विरोध दर्शविल्याचे समजते. इतर इच्छुक कार्यकर्त्यांना समर्थन देण्याची तयारी दर्शवली असली, तरी विरोध केवळ काळभोर यांनाच असल्याची चर्चा आहे.

निर्णयाकडे लागलेले लक्ष
भाजपकडून निष्ठावंत व जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत काळभोर यांना संधी मिळणार की त्यांना बाजूला सारले जाणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. भोसरीतील भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा पुढील टप्पा काय असेल, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआखातात अडकलेल्या जळगावकरांना मंत्री गुलाबराव पाटील यांचा दिलासा
Next Article पीएमपीएमएलमध्ये नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करा; सचिन काळभोर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

April 5, 2026

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी

By Jansamrattimes@gmail.comApril 5, 20260
Spread the love

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत.…

जगातील सर्वात महागडा आंबा

April 5, 2026

‘जन सम्राट टाईम्स’चा टिटवाळा येथून राज्यस्तरीय शुभारंभ; मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते प्रकाशन

April 4, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘शिवराय’ पुस्तक खरेदी निर्णय चर्चेत

April 4, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?