मैत्रेय बुद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिकेचे सहावे पुष्प संपन्न
‘सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर विद्याताई झणके यांचे प्रभावी प्रबोधन
भुसावळ | प्रतिनिधी :
मैत्रेय बुद्ध विहार, नालंदा नगर, भुसावळ येथे भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व यांच्या वतीने आयोजित जळगाव पूर्व वर्षावास धम्म प्रवचन मालिकेतील सहावे पुष्प उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
यावेळी केंद्रीय शिक्षिका तथा जिल्हा पर्यटन सचिव, भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व यांच्या आयु. नि. विद्याताई झणके यांनी ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी अत्यंत सोप्या, सहज आणि समजेल अशा भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान, संघर्ष, विचार आणि सामाजिक योगदानाची विविध उदाहरणांसह माहिती दिली.
डॉ. आंबेडकरांचे विचार समाजासाठी दिशादर्शक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला दिलेले महत्त्व, सामाजिक समता, स्वाभिमान आणि मानवमुक्तीसाठी केलेला संघर्ष यांचा उहापोह विद्याताई झणके यांनी आपल्या प्रबोधनातून केला. ज्ञानाच्या माध्यमातून समाजाला सक्षम करण्याचा बाबासाहेबांचा विचार प्रत्येकाने आचरणात आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष आद. प्रियंकाताई अहिरे, शहर संघटक आद. नि. सुजाताताई जंजाळे, शहर संघटक आद. नि. वर्षाताई जाधव, शहर संघटक आद. नि. घायतडक ताई, आद. अनुसयाताई डी. अहिरे, आद. सुमनताई पवार, आद. सीमाताई बावसकर, आद. नि. माधुरीताई भालेराव यांच्यासह शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच परिसरातील श्रद्धाशील व धम्मनिष्ठ बौद्ध उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रवचनाचा लाभ घेतला. वर्षावासाच्या निमित्ताने आयोजित या प्रवचनमालेमुळे परिसरात धम्मविचार आणि सामाजिक प्रबोधनाचे वातावरण निर्माण झाले आहे.
