६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांनी रचला इतिहास; शीर्षासनातून विश्वविक्रमाची नोंद
सुमारे ३ फूट उंच टेबलवर ८.२२ सेकंद शीर्षासन; IEA Book of World Records मध्ये कामगिरीची नोंद
देहूरोड (पुणे) | प्रतिनिधी :
वय हे केवळ एक आकडा असल्याचे सिद्ध करत ६९ वर्षीय श्री. राम यादव अडसुळ यांनी अनोखी कामगिरी करत विक्रमाची नोंद केली आहे. देहूरोड येथे आयोजित विशेष विक्रम प्रयत्नादरम्यान त्यांनी सुमारे तीन फूट उंच टेबलवर ८.२२ सेकंद शीर्षासन (Headstand) करून विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या या कामगिरीची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स (IEA Book of World Records) मध्ये करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा विक्रम प्रयत्न IEA Book of World Recordsच्या ज्युरी पॅनलच्या देखरेखीखाली पार पडला. निर्धारित मार्गदर्शक तत्त्वे आणि पडताळणी प्रक्रियेनुसार ज्युरी सदस्यांनी कामगिरीची अधिकृत नोंद व सत्यापन केले.

जिद्द आणि चिकाटीचे कौतुक
यावेळी डॉ. संदीप सिंह (मुख्य कार्यकारी अधिकारी – IEA Book of World Records) तसेच योगसद्गुरू डॉ. कृष्णदेव गिरीजी महाराज (राष्ट्रीय ज्युरी, महाराष्ट्र) प्रमुख उपस्थित होते. त्यांनी राम यादव अडसुळ यांच्या जिद्द, चिकाटी आणि समर्पणाचे कौतुक करत ही कामगिरी समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून अमर राम अडसुळ, लहू राम अडसुळ, डॉ. राजेंद्र ताकले, दीपक मित्तल, सुशीलकुमार गोयल, आकाश गायकवाड आणि मानव लोहेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास माध्यम प्रतिनिधी म्हणून सागर खोट, शुभम खोट, नवशाद अन्सारी आणि नेहा सोनवणे यांनी उपस्थिती लावली.

ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव
विक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर श्री. राम यादव अडसुळ यांना ट्रॉफी, मेडल, बॅज, प्रमाणपत्र आणि रेकॉर्ड किट प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत, “जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्य असेल तर कोणत्याही वयात नवा इतिहास घडवता येतो,” असे मत व्यक्त केले.
विविध स्तरांतून अभिनंदन
राम यादव अडसुळ यांच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
संपर्क
लहू राम अडसुळ
+919307775803
