संजय सोनार कळवाडीकर यांना राज्यस्तरीय ‘आदर्श आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर
दोन दशकांच्या ग्रामीण आरोग्यसेवेची दखल; कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र कौतुक
भडगाव ता. प्रतिनिधी : गणेश रावळ : ग्रामीण भागात गेल्या दोन दशकांपासून आरोग्यसेवेचे कार्य करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपरखेड येथील आरोग्य निरीक्षक संजय सोनार कळवाडीकर यांना जिनियस मास्टर्स फाउंडेशन, जामनेर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘आदर्श आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या दीर्घकालीन आरोग्यसेवेची तसेच कोरोना महामारीच्या काळातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
संजय सोनार यांनी सन २००६ मध्ये आरोग्य सेवक म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर गेल्या सुमारे २० वर्षांपासून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा देत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. आरोग्यविषयक जनजागृती, नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे आणि विविध शासकीय आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी योगदान दिले आहे.
कोरोना काळातील कार्य ठरले अविस्मरणीय
कोरोना महामारीच्या कठीण काळात सोनार यांनी तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून आरोग्यविषयक जनजागृती आणि सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. कोरोना योद्धा म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. प्रतिकूल परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने आरोग्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
सामाजिक उपक्रमांसाठी फाउंडेशनचा पुढाकार
जिनियस मास्टर्स फाउंडेशन, जामनेरची स्थापना २० ऑक्टोबर २०२१ रोजी झाली असून फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती संजय सोनार यांनी दिली.
फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ‘वंचितांची दिवाळी’ हा उपक्रम राबवून गरजू नागरिकांना साड्या व फराळाचे वाटप केले जाते. तसेच जळगाव जिल्ह्यातील सुमारे ६०० शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि संगणकांचे वाटप करण्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धनासाठीही फाउंडेशनकडून दरवर्षी जून महिन्यात ४० शाळांची निवड करून प्रत्येक शाळेला पाच वृक्ष देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला जातो. सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रातील या उपक्रमांमुळे
