भडगाव तालुक्यात सरपंचपदाच्या आरक्षणाचा थरार; ७ आणि ८ सप्टेंबरला ठरणार गावागावचा ‘कारभारी’!
OBC व सर्वसाधारण प्रवर्गाची ७ सप्टेंबरला सोडत; ८ सप्टेंबरला ५० टक्के महिला आरक्षणाचा फैसला
भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ
भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी कोणत्या गावाचे पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ग्रामस्थ, इच्छुक उमेदवार, आजी-माजी पदाधिकारी आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेल्या सरपंचपदाच्या आरक्षणाची अधिकृत सोडत ७ आणि ८ सप्टेंबर २०२६ रोजी काढण्यात येणार आहे.
मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ मधील नियम २ अ (५) व (६) मधील तरतुदींनुसार ही आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये इच्छुकांच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
SC-ST आरक्षण कायम; आता OBC आणि सर्वसाधारण प्रवर्गाकडे लक्ष
ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणात कोणताही बदल झालेला नाही.
आता नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी विशेष सोडत काढण्यात येणार आहे.
यामुळे कोणत्या गावात कोणत्या प्रवर्गाचा सरपंच होणार, याचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.
७ सप्टेंबरला OBC आणि सर्वसाधारण प्रवर्गाची सोडत
दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती भडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉलमध्ये सरपंचपदासाठी OBC आणि सर्वसाधारण प्रवर्गाची सोडत काढण्यात येणार आहे.
ही सोडत तहसीलदार शितल सोलाट यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे
