तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भवरखेडे विद्यालयाचा दमदार विजय
४०० मीटर धावण्यात भूषण पाटील प्रथम; ८०० व २०० मीटरमध्ये कल्पेश व सागर पाटील यांना तृतीय क्रमांक
धरणगाव | प्रतिनिधी : धरणगाव येथे आयोजित तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत भवरखेडे विद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विविध धावण्याच्या स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या तीन खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवत तालुकास्तरावर आपली छाप पाडली.
४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत इयत्ता दहावीचा विद्यार्थी भूषण अनिल पाटील याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे ८०० मीटर धावण्यात कल्पेश शांताराम पाटील याने तृतीय क्रमांक, तर २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सागर नगराज पाटील यानेही तृतीय क्रमांक मिळवला.
या यशामुळे भवरखेडे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला नवी ओळख मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि क्रीडा मार्गदर्शनाचे हे फलित असल्याचे मानले जात आहे.
संस्थाध्यक्षांकडून अभिनंदन
विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. शांताराम पाटील यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोनल पाटील यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षक समाधान पाटील, स्वप्नील पवार, राजेश ठाकरे, सविता पाटील, पंकज ठाकरे, अनिता पाटील, सुनिता लोहार तसेच शिक्षकेतर कर्मचारी अजय बाविस्कर व मयूर पाटील यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
आता तालुकास्तरीय यशानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेतही भवरखेडे विद्यालयाचे खेळाडू दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा शिक्षक व पालकांनी व्यक्त केली.
