निंभोरा बुद्रुक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठीत
सुमेध कांबळे अध्यक्षपदी, आशिष सुरवाडे यांची कार्याध्यक्षपदी निवड; १४ एप्रिल २०२७ रोजी जयंती उत्सवाचे आयोजन
भुसावळ : संघरत्न सपकाळे
तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याच्या नियोजनासाठी सार्वजनिक जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली. त्रिरत्न बुद्ध विहार येथे एन. टी. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीला प्रकाश सरदार, सी. एम. यावलकर, रमेश सिरसाठ, रमेश खंडारे, दीपक सुरवाडे, मनीष सुरवाडे, अरुण भालेराव यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेच्या शाखाध्यक्ष उषाताई सुरवाडे, सरचिटणीस प्रज्ञा खंडारे, केंद्रीय शिक्षिका करुणा नरवाडे, चंदा खंडारे, वैशाली जाधव, प्रज्ञा मेश्राम, रत्ना नाईक आदी उपस्थित होते. तसेच गावातील समाजबांधव आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
१४ एप्रिलला जयंती उत्सवाचे आयोजन
येत्या १४ एप्रिल २०२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. उत्सवाचे नियोजन आणि आयोजन प्रभावीपणे पार पाडण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यकारिणी निवडण्यात आली.
नूतन कार्यकारिणी
-
अध्यक्ष : सुमेध कांबळे
-
कार्याध्यक्ष : आशिष सुरवाडे
-
उपाध्यक्ष : कुणाल इंगळे
-
सचिव : सूरज पवार
-
कोषाध्यक्ष : दिनेश साळवे
-
सहकोषाध्यक्ष : प्रणव मेश्राम
-
प्रसिद्धीप्रमुख : रमेश खंडारे
-
संघटक : अविनाश जाधव
सल्लागार : एन. टी. इंगळे, रमेश सिरसाठ, सी. एम. यावलकर, करुणा नरवाडे, उषा सुरवाडे, चंदा खंडारे.
सदस्य : गौरव नरवडे, मनीष सुरवाडे, विशाल जोहरे, अरुण भालेराव, उल्हास मोरे, सौरव सरदार, सागर नाईक, निखिल मेश्राम, तरुण गवई आणि विद्यानंद मेश्राम.
नूतन कार्यकारिणीच्या निवडीनंतर उपस्थित समाजबांधवांनी जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
