Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पाणीदार आलेवाडीची वाटचाल; लोकसहभागातून उभा राहतोय जलक्रांतीचा आदर्श

April 11, 2026

विदर्भ आणि मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य धक्के

April 11, 2026

एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज

April 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»महाराष्ट्र»विदर्भ आणि मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य धक्के
महाराष्ट्र

विदर्भ आणि मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य धक्के

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 11, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Vidarbha, Marathwada, earthquake, mild, tremors,
Vidarbha, Marathwada, earthquake, mild, tremors,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

33 वर्षानंतर मराठवाड्यात पहिला मोठा भूकंप?

महाराष्ट्र : विदर्भ आणि मराठवाडा या भागात सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वाशिम शहरातील काही भागांबरोबरच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी परिसरात आणि नांदेड शहर व परिसरात हे हलके धक्के बसले. हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथे मध्यम स्वरूपाचा धक्का जाणवला. भूकंपाच्या वेळी भूगर्भातून मोठा आवाज आला आणि त्यानंतर जमीन हलल्यासारखे जाणवले अशी माहिती नागरिकांनी दिली. सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी हे धक्के जाणवलं आहे. अशातच आता खगोलशास्त्र अभ्यासक डॉ श्रीनिवास औंधकर यांनी या भूकंपाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील खगोलशास्त्र अभ्यासक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी मराठवाड्यातील या भूकंपाबाबत बोलताना म्हटले की, आज सकाळी आठ वाजून 45 मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथे मध्यम स्वरूपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांत या भागात 30 टक्के धक्के बसले आहेत, याची नोंद घेऊन प्रशासनाने काम करणे आवश्यक आहे.

पुढे बोलताना औंधकर यांनी म्हटले की, यापूर्वी 4.5 रिश्टर स्केलचे तीन धक्के नोंदले गेले होते, मात्र आज 4.7 ची नोंद झाली आहे. यामुळे सुमारे 30 ते 35 टन ऊर्जा निर्माण झाली आहे. आगामी काळात हे धक्के वाढत गेले, तर मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हैदराबादमध्ये NGRI तसेच नांदेड विद्यापीठात भूकंपशास्त्राशी निगडित तज्ञ आहेत. त्यांच्या सहकार्याने हिंगोली भागातील भूकंपप्रवण क्षेत्राचा भौगोलिक सर्वे करून नेमके कारण शोधले पाहिजे. 30 ऑक्टोबर 1993 रोजी किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतर मराठवाड्यातील हा पहिला मोठा भूकंप मानला जाऊ शकतो.

भूकंपरोधक बांधकामाकडे वळण्याची गरज
मराठवाड्याचील लोकांनी भूकंपरोधक बांधकामाकडे वळले पाहिजे का? यावर बोलताना औंधकर यांनी म्हटले की, नक्कीच, पण बांधकाम करताना संपूर्ण आर्थिक परिस्थिती महत्त्वाची असते. बहुतांश ठिकाणी विटांचे बांधकाम केले जाते. विटांच्या बांधकामाची घरे पडलेली आहेत, तर मजबूत बांधकाम असलेल्या घरांवर फारसा परिणाम झालेला नाही. त्या भागात भूकंपरोधक घरबांधणीला प्राधान्य दिले पाहिजे. माती व दगडाची घरे या काळात पडतात, त्यामुळे आता सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.’

भूगर्भशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे
या भूकंपाचे भूगर्भीय कारण काय यावर बोलताना औंधकर म्हणाले की, मागील काळात पाऊस कसा पडला? जमिनीखाली पाण्याचा साठा कसा आहे? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भूगर्भशास्त्राचा अभ्यास करणारी संस्था हैदराबादमध्ये आहे. तेथील अधिकारी लहान-मोठ्या भूकंपांची नोंद घेऊन त्यामागील कारणांचा शोध घेतात. त्यामुळे भविष्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता तपासता येईल.’

लिगो प्रकल्पाला काही अडचण येऊ शकते का यावर बोलताना औंधकर यांनी सांगितले की, लिगो प्रकल्पाला साधारणपणे 2017-18 साली मंजुरी मिळाली आहे. हा जागतिक प्रकल्प हिंगोलीच्या गांगलवाडी भागात उभारला जात आहे. मंजुरी देताना या भागात भूकंप होणार नाहीत, असा विचार होता. मात्र 2020 नंतर भूकंपांची मालिका दिसून येत आहे. भूकंप नसलेल्या क्षेत्रात ही वेधशाळा उभारण्याचा विचार होता, त्यामुळे आता या बाबतीत पुन्हा निर्णय घेताना विचार केला जाईल.’

प्राण्यांना भूकंपाचे संकेत मिळतात का?
प्रशासनाने काय खबरदारी घेतली पाहिजे या प्रश्नावर बोलताना औंधकर म्हणाले की, भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे, तो झाल्यानंतरच त्याची जाणीव होते. पुढील अर्ध्या तासात भूकंप होणार आहे, असे अचूक सांगणारी कोणतीही यंत्रणा जगात नाही. वर्षाकाठी पृथ्वीवर सुमारे 15,000 भूकंपाचे धक्के बसतात. साधारणतः 5 ते 5.5 रिश्टर स्केलच्या पुढे गेल्यास ते मनुष्याला हानिकारक ठरू शकतात. पक्षी आणि प्राण्यांना भूकंपाचे संकेत मिळतात का? यावर बोलताना त्यांनी म्हटले की, काही पक्षी, वटवाघुळे आणि हत्ती यांना संवेदनशीलता अधिक असते. भूकंपाच्या तरंगांची जाणीव पक्षी व प्राण्यांना आधी होते.’

earthquake Marathwada mild tremors Vidarbha धक्के भूकंप मराठवाडा विदर्भ सौम्य
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleएप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
Next Article पाणीदार आलेवाडीची वाटचाल; लोकसहभागातून उभा राहतोय जलक्रांतीचा आदर्श
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

पाणीदार आलेवाडीची वाटचाल; लोकसहभागातून उभा राहतोय जलक्रांतीचा आदर्श

April 11, 2026

एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज

April 11, 2026

घरकुलाचा गैरवापर; सलून दुकान थाटल्याचा धक्कादायक प्रकार

April 11, 2026

सूर्यवंशी–जुरेलची विजयी भागीदारी; राजस्थानचा आरसीबीवर ६ गडी राखून दमदार विजय

April 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पाणीदार आलेवाडीची वाटचाल; लोकसहभागातून उभा राहतोय जलक्रांतीचा आदर्श

By Jansamrattimes@gmail.comApril 11, 20260
Spread the love

सह्याद्रीच्या कुशीतल्या छोट्याशा गावाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ संकल्पनेतून घडवली परिवर्तनाची नवी गाथा जावळी :…

विदर्भ आणि मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य धक्के

April 11, 2026

एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज

April 11, 2026

घरकुलाचा गैरवापर; सलून दुकान थाटल्याचा धक्कादायक प्रकार

April 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?