Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खाटू श्याम भक्तांसाठी खुशखबर! धरणगावहून आता थेट रेल्वे सेवा सुरू

May 13, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये खदखद!

May 13, 2026

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी; फेरीवाला लॉबीची दादागिरी उघड

May 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»इ-पेपर»पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये खदखद!
इ-पेपर

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये खदखद!

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comMay 13, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Pimpri-Chinchwad, Sankhat, Corporator, BJP, Khadkhad,
Pimpri-Chinchwad, Sankhat, Corporator, BJP, Khadkhad,
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चार महिने उलटूनही नियुक्त्या रखडल्या; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, गटबाजी चव्हाट्यावर

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महापालिका निवडणुकीनंतर तब्बल चार महिने उलटूनही स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या जाहीर न झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या मुद्द्यावरून भाजपमधील अंतर्गत गटबाजीही आता उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे.

महापालिकेत भाजपकडून सात स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या तीन नावांबाबत तयारी पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. मात्र भाजपकडून अद्याप अधिकृत नावे जाहीर न झाल्याने नियुक्ती प्रक्रिया रखडल्याचा आरोप केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांना घंटा भेट आंदोलनाचा प्रयत्न
या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात ‘घंटा भेट’ देण्याचा प्रयत्न केला होता. जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि त्यांना स्वीकृत नगरसेवक पदावर संधी द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र आंदोलनापूर्वीच निगडी पोलिसांनी काळभोर यांना ताब्यात घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, पोलिसांनी दबावतंत्र वापरत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. “जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून केवळ आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री समर्थकांना संधी दिली जाणार का?” असा सवाल आता पक्षांतर्गत उपस्थित केला जात आहे.

स्थायी समितीतही विषय नाही
१५ मे २०२६ रोजी होणाऱ्या स्थायी समिती सभेतही स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा ठराव ठेवण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात या नियुक्त्या होणार की पुन्हा विषय लांबणीवर टाकला जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शहरात भाजपचे चार आमदार असले तरी अंतिम निर्णय हा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरूनच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांची भूमिका दुय्यम ठरत असल्याचेही बोलले जात आहे.

राष्ट्रवादीच्या भूमिकेकडेही लक्ष
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन स्वीकृत नगरसेवक घोषित होणार की त्यांचाही प्रस्ताव फेटाळला जाणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महापालिका आयुक्त या संपूर्ण विषयावर काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वीकृत नगरसेवक नियुक्तीच्या मुद्द्यावरून भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून, आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

BJP corporator Khadkhad Pimpri-Chinchwad Sankhat खदखद नगरसेवक पिंपरी-चिंचवड भाजप स्वीकृत
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी; फेरीवाला लॉबीची दादागिरी उघड
Next Article खाटू श्याम भक्तांसाठी खुशखबर! धरणगावहून आता थेट रेल्वे सेवा सुरू
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

खाटू श्याम भक्तांसाठी खुशखबर! धरणगावहून आता थेट रेल्वे सेवा सुरू

May 13, 2026

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी; फेरीवाला लॉबीची दादागिरी उघड

May 13, 2026

भागवत कथेच्या संस्कारातून खेडीढोकची युवा पिढी निर्व्यसनीतेकडे!

May 13, 2026

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय मृत्यू प्रकरण तापले

May 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
इ-पेपर

खाटू श्याम भक्तांसाठी खुशखबर! धरणगावहून आता थेट रेल्वे सेवा सुरू

By Jansamrattimes@gmail.comMay 13, 20260
Spread the love

१७२९५ काकीनाडा टाऊन – हिसार एक्सप्रेसचे धरणगाव स्थानकावर ऐतिहासिक स्वागत; दर बुधवारी रिंगससाठी थेट प्रवासाची…

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवकांवरून भाजपमध्ये खदखद!

May 13, 2026

पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकाराला धमकी; फेरीवाला लॉबीची दादागिरी उघड

May 13, 2026

भागवत कथेच्या संस्कारातून खेडीढोकची युवा पिढी निर्व्यसनीतेकडे!

May 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?